निजामपूर येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

जमियते उलेमा हिंद, निजामपूर तर्फे मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जमियतेचे सरचिटणीस मौलाना शकील अहमद यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मौलाना हाफीज तौसिफ तांबोळी यांनी भूषविले.

यावेळी सरपंच शितल शाह, सपोनी मयुर भामरे, प्रियदर्शनी थोरात, माजी उपसभापती डॉ. प्रा. रविंद्र ठाकरे, ग.स. बँकेचे संचालक प्रकाश बच्छावसर, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन चितम, हाजी मुश्ताक सुफी, डॉ. तुराब अन्सारी, हाजी मियां बेग, सुरैय्या पठाण, ताहीर बेग मिर्झा, युसुफ सैय्यद, अजर शेख, पत्रकार परवेज सैय्यद, डॉ. अनस अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात मौलाना शकील अहमद, डॉ. तुराब अन्सारी, मौलाना अफजल पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सपोनी मयुर भामरे यांनी मोहम्मद पैगंबरांच्या जीवनातील कार्यांचा उल्लेख करत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच जमियते उलेमा हिंदच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून आरोग्य तपासणीसंदर्भात मार्गदर्शन केले.

शिबिराचे सूत्रसंचालन अयाज अहमद अयाज यांनी केले तर आभार प्रदर्शन मुजमिल मिर्झा यांनी मानले. तसेच या शिबिरात जवळपास ७५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. नंदुरबार येथील स्मित हॉस्पिटलचे डॉ. नरेश शिंदे, डॉ. भरत पटेल, डॉ. हर्षला पाटील, डॉ. प्रशांत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष जुबेर सैय्यद, मुजमिल मिर्झा, राईक पठाण, अन्वर तांबोळी, सज्जाद मिर्झा, आमिर पठाण, तौसीफ शेख, शरीफ खाटीक, अर्शद शेख, शाकीब पठाण, नवेस पठाण, साहिल सैय्यद, दानिश सैय्यद, शाहरुख मिर्झा, तनवीर शेख, फैजान शेख, मुश्ताक मन्यार, फैजान सैय्यद आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधी- हेमंत महाले, निजामपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top