प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेतून कै. इरफान शेख यांच्या कुटुंबीयांना २ लाखांचा धनादेश

निजामपूर-हस्ती को.ऑप. बँक,निजामपूर शाखेच्या खातेदार कै. इरफान मुश्ताक शेख यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार म्हणून“प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा”योजनेअंतर्गत विमा रक्कम प्रदान करण्यात आली. या योजनेतून दिवंगत शेख यांच्या वारसदार श्रीमती तरुन्नूमबी इरफान शेख यांना रु. २ लाखांचा धनादेश देण्यात आला. सदर धनादेशाचा प्रदान सोहळा बँकेचे उपाध्यक्ष डॉ. दिलीप कुमारजी चोरडिया यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी शाखा समितीचे व्हा. चेअरमन नयनकुमार शाह, सदस्य प्रा. सुधाकर जाधव, डॉ. प्रकाश गवळे, भगवान धामणे, विजय रेलन, प्रशांत पाटील आदी मान्यवरांसह शाखा व्यवस्थापक पराग शाह, अधिकारी सचिन काकूस्ते, सागर देवरे, अश्विनी पाटील, प्रविण खरे, किशोर वाडीले, सुरेश पाटील, विलास पाटील तसेच अनेक खातेदार व ग्राहक उपस्थित होते. विमा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी बँकेचे चेअरमन कैलासभाऊ जैन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील अधिकारी सुहास भावसार व मिलिंद पवार यांनी विशेष प्रयत्न केले. यामुळे विमा रक्कम लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचली. बँक फक्त आर्थिक व्यवहारापुरत मर्यादित नसून समाजातील घटकांच्या प्रगतीसाठी व नेहमीच खातेदारांच्या हितासाठी काम करणारी संस्था आहे.बँकेचे ब्रीदवाक्य“प्रगती तुमची, प्रतिज्ञा आमची”हेच बँक व परिवाराची ची कार्यपद्धती आहे. बँक आपल्या ग्राहकांना पारदर्शक व तत्पर व्यवहार,नेट बँकिंग,वाहन व सोनेतारण कर्ज,सोलर कर्ज योजना, सुरक्षित लॉकर सुविधा अशा अनेक आधुनिक सेवा उपलब्ध करून देते. तसेच,प्रत्येक खातेधारकांनी “प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना”चा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा चेअरमन पंडित मुरलीधर बदामे यांनी या वेळी केले.

-प्रतिनिधी हेमंत महाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top