खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव संपन्न

धुळे :महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ आणि खानदेशातील कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या निमित्ताने देवीला ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

या दिवशी चंद्रावर आरूढ रूपातील एकविरा देवीची विशेष पूजा बांधण्यात आली, तर संध्याकाळी भक्तिमय संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मंदिर परिसरात दिवसभर भक्ती, आरती आणि धार्मिक सोहळ्यांचा माहोल होता. या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top