नरडाणा पोलिसांची कारवाई
धुळे : नरडाणा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत दोन आयशर ट्रकमधून महाराष्ट्रात बंदी असलेला कोट्यवधी रुपये किंमतीचा गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ रोजी पहाटेच्या दरम्यान नरडाणा पोलिसांना दोन संशयास्पद आयशर ट्रक दिसून आले. पोलिसांनी तत्काळ ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला आढळून आला.
या कारवाईनंतर पोलिसांनी संबंधित ट्रक ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.
-प्रतिनिधी समाधान ठाकरे

