सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या बूटफेक घटनेचा साक्रीत तीव्र निषेध

साक्री (प्रतिनिधी): भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान एका वकिलाने केलेल्या बूटफेकीच्या अशोभनीय प्रकाराचा साक्री तालुक्यात तीव्र निषेध करण्यात आला आहे. या घटनेमुळे न्यायसंस्थेच्या सन्मानावर गदा आल्याची भावना नागरिक आणि विविध संघटनांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर साक्रीतील नागरिकांच्या वतीने तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपतींना निषेध निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, न्यायसंस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर अशा प्रकारचा हल्ला करणे हे केवळ वैयक्तिक अपमान नसून भारतीय लोकशाही, संविधानिक संस्था आणि न्यायव्यवस्थेवर थेट आघात आहे.

निवेदनात म्हटले आहे, “हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा, असभ्य आणि असहिष्णुतेचे द्योतक आहे. अशा कृतींमुळे न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होण्याचा धोका आहे. या कृत्याला जबाबदार व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.”

या प्रसंगी नागरिकांनी आणि समाजबांधवांनी न्यायसंस्थेचा सन्मान राखण्याचे आणि संविधानिक मूल्यांप्रती आदर टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. तहसीलदार यांना समाज बांधवांच्या वतीने संविधानाची प्रत देण्यात आली.

निवेदनावर कमलाकर मोहिते, राजेंद्र वाघ, प्रा. कैलास वाघ, राजेंद्र सामुद्रे, शरद वाघ, रजनीकांत वाघ, प्रा. आर. डी. साळवे, डी. एम. मोहिते, नानाजी मोरे, प्रकाश वाघ, जयवंत शिंदे, शरद मोरे, दिलीप सूर्यवंशी, रवींद्र मोरे, रामराव बच्छाव, सूर्यकांत बच्छाव, पंडित अहिरे, कमलेश मोहिते, नाना ढालवाले, दिलीप मोरे, दादा पवार, कारभारी अहिरे आदींसह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  • प्रतिनिधी निलेश सावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top