गिधाडे तापी पुलावर दुर्दैवी घटना : विरदेल तालुक्यातील तरुणाची नदीत उडी; शोधकार्य सुरू

शिंदखेडा तालुक्यातील गिधाडे तापी पुलावर आज 13 ऑक्टोबर रोजी एका तरुणाने नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण विरदेल गावचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनास्थळी नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविले असून, नातेवाईक देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिस आणि आपत्कालीन पथकाकडून तरुणाचा शोध सुरू असून बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, पुलावर उभी असलेली गाडी कोणाची आहे आणि ती उडी घेतलेल्या तरुणाचीच आहे का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

-प्रतिनिधी समाधान ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top