एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस आणि वेतनवाढीचा हप्ता — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

साक्री : राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त कृती समितीच्या 18 संघटनांनी 13 ऑक्टोबरपासून पुकारलेल्या धरणे आंदोलनाचा तोडगा अखेर निघाला आहे. मुंबईत झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार आनंदराव अडसूळ आणि सर्व 18 संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात आला असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले की —
– यंदाच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपयांचा बोनस,
– 12,500 रुपयांची सणउचल,
तसेच वेतनवाढीचा हप्ता दिवाळीपूर्वी वितरित करण्यात येणार आहे.

  • प्रतिनिधी निलेश सावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top