डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साक्री येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त महिला भगिनींच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक दीपक वाघ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर परिसरातील महिलांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. कैलास वाघ यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या यशामागे माता रमाई यांचा मूक त्याग, अपार संयम आणि धैर्य मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते. त्यांचा त्यागमय जीवनप्रवास आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वाघ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजेंद्र सामुद्रे यांनी मानले.
या अभिवादन सोहळ्यास हिराबाई वाघ, लताबाई वाघ, केवळबाई वाघ, रेखाबाई साळवे, सुनंदाबाई वाघ यांच्यासह रजनीकांत वाघ, कपिल वाघ, पंडित साळवे, जगदीश वाघ, अतुल मोहिते, राज वाघ, पंडित अहिरे, गोविंद सोनवणे, उदय मोरे, नाना वाघ, दिलीप वाघ, भटू महाले, अनिल वाघ, गोटू अहिरे, प्रशांत वाघ आदींसह परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-प्रतिनिधी निलेश सावळे

