६.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक
दोंडाईचा | दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक इमरान खान व त्यांच्या पथकाने मांडळ चौफुली परिसरात सापळा रचला. धुळे येथून दोंडाईचा मार्गे अवैध दारू वाहतूक करणारी बोलेरो पिकअप (क्र. MH 18 BG 9040) गाडी पाठलाग करून थांबवण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहन चालक शेखर पंडित माळी (वय ४४, रा. प्रियदर्शनी नगर, नगाव बारी, देवपूर, धुळे) याला अवैध दारूसह ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ६,६१,३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यात—
- बोलेरो पिकअप गाडी (किंमत अंदाजे ₹५,५०,०००)
- देशी दारू “टॅगोपंच” लेबलच्या १८० मि.ली. क्षमतेच्या २९ खोके, प्रत्येकी ४८ बाटल्या प्रमाणे एकूण १,३९२ बाटल्या (किंमत ₹१,११,३६०)
यांचा समावेश आहे.
संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इमरान खान करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश एन. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात पोसई इमरान खान, राजन दुसाने, निलेश होलोरे, प्रविण निंकुभे, राकेश रोकडे व ललित काळे यांचा सहभाग होता.
प्रतिनिधी समाधान ठाकरे

