धुळे जिल्ह्यातून तडीपार गुन्हेगारांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची विशेष मोहीम, चार आरोपींवर कारवाई

धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत २६ आरोपीना तडीपार करण्यात आले आहे. मात्र तडीपार असूनही प्रतिबंधित क्षेत्रात आढळून येणाऱ्या गुन्हेगारांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवून कारवाई केली आहे. चार आरोपीना अटक करून या पैकी दोन जणांना अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कलम 56 अन्वये जिल्ह्यातील एकूण 26 तडीपार गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर, तडीपार असूनही विना परवानगी प्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांनी संबंधित ठाण्यांना दिले होते.

त्या अनुषंगाने, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी दिनांक 16 आणि 17 ऑक्टोबर या दोन दिवसात ही मोहीम राबविली.दोन दिवसांची विशेष ही मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान काही तडीपार गुन्हेगार विना परवानगी प्रतिबंधित क्षेत्रात राहात असल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईत तडीपार गुन्हेगार सुनिल बापू मरसाळे (वय 23) आणि नितीन रविंद्र पाटील (वय 25) यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या व्यतिरिक्त गोपाळ रमेश चौधरी आणि समाधान देविदास पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर मोहिम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि कृष्ण पारणी, नामदेव सहारे, अमरणित मारे, वेतन मुंढे, संजय पाटील तसेच अंमलदार प्रशांत चौधरी, तुकाराम सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, जगदीश सूर्यवंशी, नितीन दिवसे आणि महेंद्र सपकाळ यांनी सहभाग घेतला.

-प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top