भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सदस्यपदी रोशन खैरनार यांची नियुक्ती; सामाजिक कार्यकर्त्याच्या निवडीचे स्वागत

धुळे शहरातील हिरे भवन येथे भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित दीपावली स्नेहमेळावा आणि पदनियुक्ती सोहळ्यात निमखेडी गावचे सामाजिक कार्यकर्ते रोशन खैरनार यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या आदेशाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान ना. जयकुमार रावल यांनी भूषवले होते. प्रमुख उपस्थितीत आ. कुणाल पाटील, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, संघटन मंत्री विजय चौधरी, भाजपा प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, जिल्हाध्यक्ष ग्रामीण रामकृष्ण खलाणे, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपाळकर, पं. समिती सभापती कैलास पाटील, शहर महिला आघाडी अध्यक्षा आरती पवार, माजी जि. प. सभापती प्रा. अरविंद जाधव, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब भदाणे, आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले आदी मान्यवर उपस्थित होते.

रोशन खैरनार यांचे सामाजिक कार्य
निमखेडीचे रोशन खैरनार हे गेली अनेक वर्षे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि रुग्णसेवा क्षेत्रात सक्रिय आहेत. गावात आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम राबविणे, तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांना चालना देणे या क्षेत्रात त्यांचा उल्लेखनीय वाटा आहे.
गावातील अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या रोशन खैरनार यांनी कोणतेही राजकीय पाठबळ नसतानाही आपल्या कार्यावर आणि जनसंपर्कावर आधारित ठाम ओळख निर्माण केली आहे.


या पदनियुक्तीमुळे निमखेडी व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड झाल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांनी याचे स्वागत केले आहे.
सरपंच राजेंद्र पाटील, गटनेते सतीश पाटील, माजी सरपंच उमेश मोरे, उपसरपंच नितीन ठाकरे, सोसायटी चेअरमन बबलू पाटील, व्हाइस चेअरमन कैलास पाटील, सदस्य रतिभान पाटील, माजी सरपंच विठ्ठल मालचे, तसेच पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी रोशन खैरनार यांना शुभेच्छा दिल्या.

पक्षातील तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
सामाजिक कार्यातून राजकीय क्षेत्रात ओळख निर्माण करणाऱ्या रोशन खैरनार यांच्या नियुक्तीमुळे तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top