कॉपर केबल चोर अटकेत, निजामपुर पोलीसांची कारवाई !४० हजारांचा मुद्देमाल जप्त

निजामपूर पोलीसांनी कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करून 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील सौर प्रकल्पांमधील वारंवार होणाऱ्या वायर चोरीच्या घटनांवर पोलिसांनी प्रभावी आळा घातला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10.35 वाजेच्या सुमारास सालटेक गावाच्या शिवारात असलेल्या Gail & Tornado Solar Companyच्या आयसीआर क्र. 09 मधील ब्लॉक नं. 21 आणि आयसीआर क्र. 13 मधील ब्लॉक नं. 47 येथून कॉपर केबल वायर चोरीस गेली होती. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0283/2025 भा.दं.सं. कलम 331, 305.3(5) अंतर्गत दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन नंदु नाना मारनर, विठ्ठल खंडू मारनर, आणि संदीप मोतीराम वाघमोडे (सर्व रा. रायपूर, ता. साक्री, जि. धुळे) या तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत चोरीतील सहभाग उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ₹40,600 किमतीच्या कॉपर केबल वायरचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.आर. बांबळे, आणि स्थानीय गुन्हे शाखेचे पोनि श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मयूर भामरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोउनि मधुकर सोमासे, पोसई यशवंत भामरे, पोसई चंद्रकांत गायकवाड, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता.

प्रतिनिधी हेमंत महाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top