मार्केट यार्ड लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

धुळे : मार्केट यार्ड परिसरातील लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाची सभा दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीमध्ये सौ. प्रतिभा मनोज ब्राह्मणकर अध्यक्ष, सौ. दिपाली विवेक दोडे उपाध्यक्ष, सौ. रजनी प्रदीप शिरोडे सचिव, सौ. अनिता दिलीप माकडे खजिनदार आणि सौ. नीलिमा हेमंत कोठावदे सहसचिव म्हणून निवड झाल्या आहेत.

सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने तसेच मार्केट यार्ड परिसर लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी महिला सदस्यांनी नव्या कार्यकारिणीकडून समाजकार्य आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने नवे उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top