5 डिसेंबर ला राज्यभरातील सर्व शाळा बंद

शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या टीईटी परीक्षा व इतर मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन.

राज्यातील शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या टीईटी परीक्षा व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील विविध शिक्षक संघटनांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजीच्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष सौ शुभांगी पाटील यांनी पत्रका द्वारे सदर पाठिंबा जाहीर केला . महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना ही शिक्षकांच्या हितासाठी व हक्कासाठी लढणारी संघटना असून शिक्षकांचा कोणताही प्रश्न असो किंवा त्यासाठी कोणतेही आंदोलन असो शिक्षकांच्या हितासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना त्यास सक्रिय पाठिंबा देते.

त्यामुळे सदर आंदोलनात महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या सर्व राज्य कार्यकारणी सदस्य , विभागीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतरही संघटनांनी पाठिंबा देत सदरच्या आंदोलन यशस्वी करण्याचे आव्हान राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी पत्रकार द्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top