साक्री शहरातील आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिन अत्यंत श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. महामानव, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी-कोटी नमन करत त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला अनुयायांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात पुतळ्याच्या पूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी, माजी नगराध्यक्ष जयश्री पवार, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब गीते, माजी नगरसेविका अॅड. पूनम काकुस्ते, नगरसेवक दीपक वाघ, सुमित नागरे, पंकज मराठे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद बेडसे, विजय भोसले, महेंद्र देसले, आर.पी. भामरे, अविनाश सोनार, राजेंद्र वाघ, रजनीकांत वाघ, राजेंद्र सामुद्रे, प्रा. कैलास वाघ, प्रताप वेंदे, जी.टी. मोहिते, प्रा. आर.डी. साळवे, डी.एम. मोहिते, अनिल मगर, पंडित साळवे, दिलीप वाघ, नाना वाघ, सतीश मोहिते, सुधीर सोनवणे, रामदास बच्छाव, कपिल वाघ, दशरथ अहिरे, बंटी अहिरे आदींचा समावेश होता.
हजारो अनुयायांनी उपस्थित राहून आंबेडकरांच्या पुतळ्यास मानवंदना देत महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधले. साक्री शहरात वातावरणात श्रध्देचा व आदराचा भाव ओतप्रोत भरलेला दिसून आला.
-प्रतिनिधी निलेश सावळे

