आयजींचे पथक असतानाच दोंडाईचात पोलीस अधिकाऱ्याचे घर फोडले

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक ९ ते १२ डिसेंबरदरम्यान जिल्हा दौऱ्यावर असून धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी सुरू आहे. याच दरम्यान दोंडाईचा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

दोंडाईचा शहरातील कोठारी पार्क परिसरातील हस्ती भवनजवळ राहणारे महेंद्र ठाकूर हे पोलीस कर्मचारी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते मागील १४ दिवसांपासून नाशिक येथे त्यांच्या वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी अनुपस्थित होते. या काळात त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची माहिती मिळत आहे.

आज ठाकूर यांचा परिवार घरी परतल्यानंतर हा प्रकार उघड झाला. घरातील नेमका किती ऐवज चोरीस गेला आहे, याची मोजणी अद्याप सुरू असून अचूक तपशील समोर आलेला नाही.

घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेमुळे IG इन्स्पेक्शनदरम्यानच पोलिस कर्मचाऱ्याच्याच घरात चोरी झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

प्रतिनिधी समाधान ठाकरे, दोंडाईचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top