धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरण: शेतकरी संघटनेची बडतर्फीची मागणी मागणी
महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असताना गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आली असताना त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप करीत गुन्हा दाखल करण्यात आला होता… धुळ्यातील जिल्हा उद्योग केंद्रात कार्यरत असलेले तत्कालीन अधिकारी व्ही. के. शिवदास यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना चक्क महाव्यवस्थापक पदाचे ‘बक्षीस’ देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रशासनातील त्यांचा ‘शुक्राचार्य’ (पाठीराखा) नेमका कोण? असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे.
धुळे जिल्ह्यात सध्या कापूस, मका आणि कांदा पिकांचा हंगाम सुरू आहे. मात्र, बियाणे आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्या कंपन्या आणि डीलर्स कडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. बोगस बियाणे किंवा निकृष्ट कीटक नाशकांमुळे नुकसान होऊनही संबंधित कंपनी व डीलर वर कृषी विभागाकडून कोणतीही कडक कारवाई होत नाही, याकडेही समितीचे लक्ष वेधण्यात आले. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात कडक कायदा मंजूर करावा. या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
