घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड…

धुळे तालुका पोलीसांची धडक कामगिरी

मागील महिन्यात  सकाळच्या सुमारास कुसुंबा  गावांतील तक्रारदार वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील 478000/-रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागीने व रोख रुपये कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन घेवुन गेल्याने गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.घरफोडी करणाऱ्या या टोळीने कुसुंबा, नेर, मोराणे, कुंडाणे, अकलाड या गावांत गेल्या दोन महिन्यात घरफोडीचे प्रकार घडले व त्या प्रकरणांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. यामुळे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक, धुळे  श्रीकांत धिवरे,  अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे,  संजय बांबळे उप-विभागीय पोलीस अधिकारी यांना घटनेची माहिती देवून त्यांच्या मार्गदर्शनपर सुचनेप्रमाणे अधिनस्त असलेले अधिकरी व अंमलदारांना गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याचे सुचित केले.

धुळे तालुका पोलीस ठाण्याचे लेखनिक पोहवा नितीन चव्हाण व शोध पथकातील पोहवा-उमेश पवार व पोकों-कुणाल शिंगाणे, पोकों-राजु पावरा यांनी गुन्हयातील अज्ञात आरोर्पीचा शोध घेणेकामी पारंपारिक तपास पध्दतीचा वापर करुन साक्षीदारांना विचारपुस, अभिलेखावरील ज्ञात गुन्हेगारांची तपासणी, गुप्त बातमीदारांना माहिती विचारपुस करुन पोकों-गजेंद्र मुंडे, पोकों-राहुल देवरे, पोकों-प्रतिक देसले यांनी देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अत्यंत कुशल पध्दतीने तांत्रीक विश्लेषणाचे अथक परिश्रम घेवून परिसरातील व तिन राज्याच्या रस्त्यांवरील सुमारे 375 ANPR सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी केली ज्यात काही संशयीतांच्या हालचाली पोलीसांच्या नजरेतुन लपल्या नाहीत त्यावरुन पुराव्यांची सांगड व जुळवाजुळव करुन प्रयत्नांची पराकाष्टा करत गेल्या 17 दिवसांपासुन आरोपी शोध कार्यात सातत्य ठेवून संशयीत आरोपींचा मागोवा काढत सलग 5 दिवसांचा प्रवास करत मिळालेल्या धागेदो-यांच्या आधारे तपास पथक थेट गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवरील दाहोद व गोधरा जिल्हयात जावुन धडकले. स्थानिक पोलीसांच्या मदतीने संशयीतांना ताब्यात घेतले त्यात आरोपींनी वरील घरफोडी गुन्हयांची कबुली देवुन त्यांच्यासोबत धुळे येथील स्थानिक साथीदार सुध्दा असल्याची माहिती दिली असुन आरोपींना धुळे येथे आणल्यानंतर आरोपींना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी मंजुर करण्यात आली आहे. व तपासांत स्थानिक साथीदाराचा शोध घेवुन त्याला सुध्दा अटक करण्यात आली आहे. यात विशेष बाब म्हणजे अटक केलेले  आरोपी यापुर्वी कोणत्याही गुन्हयात अटक नव्हते किंवा त्यांची पूर्व गुन्हेगारी इतिहास कोणत्याही पोलीस ठाण्यात उपलब्ध नाही, ताब्यात घेतलेले‌ आरोपी गुन्हा करुन लगेच परराज्यात निघुन जात असत म्हणुन ते कोणत्याही अभिलेखावर आलेले नाहीत.

प्रकरणाच्या आतापर्यंत च्या झालेल्या प्राथमिक तपासांत अटक करण्यात आलेल्या आरोपींनी एकुण 06 घरफोडी गुन्हयांची कबुली दिली असुन त्यात 120 ग्रॅम सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीकडून गुन्हयांतील बराच मुद्देमाल जप्त करण्याचे कामकाज व अटक आरोपींचे इतर साथीदारांचा शोध घेण्योच कार्य सुरू आहे.नमुद गुन्हे उघडकिस आणणेकामी पोलीस निरीक्षक,  धनंजय पाटील यांचे पर्यवेक्षणात पोहवा-नितीन चव्हाण, पोहवा-उमेश पवार, पोकों-कुणाल शिंगाणे, पोकों-गजेंद्र मुंडे, पोकों-राहुल देवरे, पोकों-प्रतिक देसले, पोकों-राजु पावरा, पोकों-जयकुमार चौधरी, पोउनि संजय पाटील [स्थागुशा), पोकों-अमोल जाधव [स्थागुशा], यांनी अथक परिश्रम घेतले असून या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक  कैलास माळी, व पोहवा-मनोज बावीस्कर धुळे तालुका पोलीस ठाणे करीत असुन आरोपींना आज १९ डिसेंबर रोजी पुन्हा  न्यायालयात हजर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top