विभागीय कबड्डी स्पर्धेत नांद्रे आश्रमशाळेचा संघ विजयी

आदिवासी विकास विभागातर्फे खेळाडू विद्यार्थ्यांचा गौरव

नाशिक विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत असलेल्या नांद्रे (ता.धुळे) येथील आश्रमशाळेने कबड्डी या स्पर्धेत१४ वर्षे वयोगटातून मुलांच्या संघाने विजय मिळविला. हा संघ राज्यस्तरावर नाशिक विभागाचे नेतृत्व करीत आहे. शासकीय अनुदानित आश्रमशाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच प्रकल्पस्तरावर झाल्या. त्यानंतर विजेता संघ विभागीय स्तरावर गेले. या स्पर्धा जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १६ ते १८ डिसेंबर या कालावधी त घेण्यात आल्या. यात १४ वर्षे वयोगटातून मुलांच्या संघाने निर्विवाद विजय प्रस्थापित केला.     

  नांद्रे आश्रमशाळेच्या खेळाडू विद्यार्थ्यांचा प्रथम पारितोषिक देऊन आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी गौरव केला. यावेळी धुळे प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील, सहाय्यक  प्रकल्पाधिकारी पवन सोनुने, मनोज पाटील, भटू आव्हाड, शिक्षण विस्ताराधिकारी सचिन चौधरी, अविनाश पाटील, सतीश काकड, संदीप पाटील, ज्योत्स्ना देवरे  क्रीडा समन्वयक विजय खैरनार क्रीडा शिक्षक स्वप्निल पाटील आदि उपस्थित होते. विजय प्राप्त करणाऱ्या संघाचा संस्थेतर्फे सत्कार करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष अनिलराव पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक एस.टी.पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक आर.एम.बोरसे, माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी पाटील, अतुल भामरे, स्वप्निल पाटील, शुभम पाटील, सायली पाटील, सचिन पाटील, काशिनाथ चौरे, योगेश भाबड, सचिन बेडसे, सुरेखा वसावे, मनोहर शिंदे, तुषार देवरे, उमेश हिरे, मिलिंद महिरे, जागृती भामरे, टी. एस. देवरे, गायत्री देसले, भटू पाटील, दिलीप पाटील, शिवदास ठाकरे, भूषण काकडे, चेतन पाटील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.  राज्यस्तरीय स्पर्धा यवतमाळ येथे होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top