शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार कलावती माळी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार रजनी अनिल वानखेडे यांचा ७८० मतांनी पराभव केला.ही निवडणूक मंत्री जयकुमार रावल यांच्या विधानसभा मतदारसंघातच पार पडल्याने, भाजपसाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा धक्का मानला जात आहे.निवडणूक निकालानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार कलावती माळी यांना एकूण ६,९९१ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवाराला ६,२११ मते मिळाली.या निकालामुळे शिंदखेडा तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे.- – प्रतिनिधी समाधान ठाकरे

