पराभवाने कोणीही संपत नसतो, आ- कुणाल पाटील

धुळे तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन

माजी आ.कुणाल पाटील यांच्या  उपस्थितीत धुळे तालुक्यातील हेंद्रुण जि.प.गटातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपुजन करण्यात आले. दरम्यान यावेळी मोघण ता.धुळे येथे कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी जुनवणे ते हेंद्रुण होरपाडा ग्रा.मा.रस्ता126 पाईपमोरी(अंदाजित रक्कम रु.40 लाख)बांधकामाचे भूमीपुजन करण्यात आले. तसेच हेंद्रुण ते होरपाडा ग्रा.मा.रस्ता 126 सुधारणा करणे (अंदाजित रक्कम रु.50 लक्ष) या कामाचे लोकार्पण करण्यात आले.    

माजी आ.कुणाल पाटील यांनी पाठपुरावा करुन या कामांसाठी निधी मंजुर करुन आणला होता. त्यानंतर मोघण ता.धुळे येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी बोलतांना मा.आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि,  पुढील पाच वर्ष विकास कामांचे लोकार्पण भूमीपूजन आणि उद्घाटन करता येईल एवढे विकासाची कामे आपण मंजुर करुन आणली आहेत. पांझरा आणि बोरी नदीवर पुलांची उभारणी करुन साखळी निर्माण केली.तालुक्यात रस्त्यांचे जाळे तयार केले. असंख्य विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत.भविष्यकाळ उज्वल आहे. कोणत्याही कार्यकर्त्याने मागे हटू नये किंवा खचून जावू नये, धुळे तालुक्यात लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी उभी केलेली ताकद आहे. त्यामुळे कोणताही कार्यकर्ता कमजोर नाही, प्रत्येक जण काम करीत असतो. गोरगरीबांच्या मदतीसाठी धावून जात असतो. जि.प. आणि पं.स.निवडणूकीत सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी देवू, कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही असे प्रतिपादन मा.आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केले.           

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला भाजपाचे धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रामकृष्ण खलाणे, बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरनार, माजी सभापती बाजीराव पाटील, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, ज्येष्ठ नेते प्रा.छबू नाना पाटील,खरेदी विक्री चेअरमन लहू पाटील, संचालक भगवान पाटील, उपसभापती नानासाहेब पाटील, माजी उपसभापती योगेश पाटील, माजी जि.प.सदस्य अरुण पाटील, संचालक विशाल सैंदाणे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस पंढरीनाथ पाटील,डॉ.चंद्रकांत राजपूत, संतोष राजपूत, गुणवंत देवरे, माजी सभापती कैलास पाटील, भाजयुमोचे सरचिटणीस गणेश गर्दे, संचालक सौ.नयना पाटील, पप्पू भदाणे, राजू पाटील, डॉ.उमेश पाटील, संचालक सुनिल पाटील, अ‍ॅड.बी.डी.पाटील, दिलीपसिंग गिरासे, विनोद बच्छाव, उत्तमसिंग राजपूत, संभाजी राजपूत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.संदिप पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार संचालक पंढरीनाथ पाटील यांनी केले. कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य डॉ.संदिप पाटील, बाजार समितीच्या संचालक सौ.नयना पाटील यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top