भाजपची विजयाकडे वाटचाल
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे काल दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपन विजयाचं खातं उघडलं होतं. परंतु आज माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक 17 मधून सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली त्यामुळे आता भाजपाचे तीन उमेदवार निवडणुकीपूर्वीच विजयी झाले आहे. ह्या विजयामुळे भाजपची आता विजयाकडे घोडदळ सुरू झाली असून पुढील काही वेळात अजून काही नगरसेवक हे बिनविरोध होतील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

