नरडाण्यात 500 रुपयांची लाच घेताना वायरमन अटकेत

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे नवीन मीटर जोडणी केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे  पाचशे रुपयाच्या  लाचेची मागणी केली होती. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच स्विकारताना कंत्राटी वायरमन साहिल महमूद मन्यार रा. वर्षी ता. शिंदखेडा यास ताब्यात घेत कारवाई करण्यात आली आहे. हि कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.  याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिनिधी : समाधान ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top