वोल्वो लक्झरीच्या आड गुटखा तस्करी उघड८ लाखांच्या गुटख्यासह बस जप्त

वोल्वो लक्झरी बसचा वापर करून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची तस्करी केली जात असल्याचा प्रकार धुळे तालुका पोलिसांनी उघड केला आहे. या कारवाईत सुमारे 8 लाख 18 हजार रुपयांचा प्रतिबंधित पान मसाल्याचा साठा तसेच सुमारे 1 कोटी 50 लाख रुपये किमतीची वोल्वो बस जप्त करण्यात आली आहे.पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर मुंबई–आग्रा महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली. इंदौरकडून मालेगावच्या दिशेने येणारी वोल्वो बस थांबवून तपासणी केली असता, प्रवाशांच्या बॅगजवळ मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित तंबाखू आढळून आला.या प्रकरणी बस चालक, कंडक्टर व इतर संबंधितांविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.पॉश लक्झरी बसच्या आडून गुटखा तस्करी केली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.-

( प्रतिनिधी : कार्तिक सोनवणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top