अवैध गांजा बाळगणाऱ्या हॉटेल चालकाला अटक

मुंबई आग्रा महामार्गावरील अवधान टोल नाक्याजवळ मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल चालकाला अवैध गांजा बाळगण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे ११६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, तो ५ ते ६ ग्रॅम वजनाच्या २१ प्लास्टिक पाऊचमध्ये भरलेला होता. जप्त केलेल्या मालाची अंदाजे किंमत सुमारे २,३२० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ५ फेब्रुवारी रोजी आरोपी ला‌ अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top