दादासाहेब फाळके पुरस्काराने तन्वी सन्मानित
धुळे जिल्ह्यातील साक्री ची तन्वी निलेश भदाणे हि लहान वयातच कलाक्षेत्रात बहुआयामी कलागुणांच्या बळावर मोठी होत आहे. अवघ्या सहा वर्षांची तन्वी वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. तिच्या या कलागुणांमुळेच तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
टिव्ही विश्वातही तिची छाप पडलेले दिसून येते. गुल्लू जासूस’ या क्राईम शोमध्ये तसेच ‘रसिली पडोसन’ मासिकासाठी तिची निवड झाली आहे. स्टार प्लसवरील ‘दिल को, तुमसे प्यार हुआ…’ आणि झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे…’ या मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. याशिवाय ‘ब्लिट्झ टुडे २०२५’ कॅलेंडर शूटमध्येही ती झळकली आहे.याशिवाय तिला वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तन्वी चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

