साक्रीच्या बेहड जिल्हा परिषद शाळेची खराब अवस्था

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या बेहड जिल्हा परिषद शाळेची अवस्था खूप बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेची शाळा हि खूप जुनी असून शाळेची कौले पूर्णपणे तुटलेली असल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी शाळेत शिरते, त्याचप्रमाणे शाळेच्या भिंतींना तडे गेले आहे. यामुळे विद्यार्थी तथा शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच संदर्भात शासनाकडे वारंवार मागणी करूनही शाळेचे काम होत नसल्यामुळे येत्या १६ फेब्रुवारी रोजी शाळा ही पंचायत समिती साक्री येथे भरू असे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.

( प्रतिनिधी : निलेश सावळे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top