धर्म सभेचे व शोभायात्रेच्या आयोजना साठी उत्सव समिती कार्यकारणी जाहिर करण्यात आली त्याचबरोबर जैताणे येथील ग्रामदैवत आई भवानी मंदिर येथे सकल हिन्दू समाजाची बैठक शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी पार पडली. या बैठकित कार्यक्रमाचे नियोजन सुरळीत पार पडावे यासाठी प्रमुख मुद्यांवर वर चर्चा करण्यात आली.यामध्ये साईड,लाईट,निधीसंकलन,शोभायात्रा,सजावट,प्रसिद्धी व प्रचार समिती यांचा समावेश करण्यात आला आहे.
या समित्यांत इथल्या प्रमुख कार्यकत्यांना एकत्र करून मुख्य आयोजन समिती स्थापन करण्यात आली.मुख्य समितीत मार्गदर्शक- नयनकुमार शाह अध्यक्ष राकेश शेवाळे, उपाध्यक्ष कमलेश भामरे,सचिव नारायण सूर्यवंशी,खजिनदार इंद्रजीत माळी,सह खजिनदार राहुल महिरे,सदस्य,सुनील पगारे,संदीप पगारे, भाऊसाहेब खलाणे,राजेंद्र शाह,गोकुळ पेंटर,गणेश खारकर, सदा महाजन समाधान महाले आदि ची निवड करण्यात आली.कार्यक्रम चे ठिकाण निश्चित झाले असून या बैठकिला निजामपूर जैताणे परिसरातील राजकिय, सामाजिक,धार्मिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संखेने संख्येने उपस्थित होते.
( प्रतिनिधी : हेमंत महाले )

