साक्री नगरपंचायतीच्या हद्दीतील प्रभाग क्र.४ येथील पाण्याच्या टाकी जवळ व मारुती मंदिराजवळ सुरू असलेल्या निष्कृष्ट वॉल कंपाऊंड व इतर विकास कामांची चौकशी करण्यात यावी याबाबत साक्री नगर पंचायतीचे मुख्याधिकारी तुषार सोनवणे यांच्याकडे आर.पी.आय चे म्हणजेच (आठवले गट) तालुकाध्यक्ष कमलाकर मोहिते यांनी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली.
साक्री शहरातील प्रभाग क्रमांक ४ च्या हद्दीत सुरू असलेले काम हे निष्कृष्ट दर्जाचे होत असून शासनाने दिलेल्या नियम अटींचे उल्लंघन होत असल्याची तक्रार रहिवाशांनी आरपीआय तालुकाध्यक्ष कमलाकर मोहिते यांच्याकडे केली होती. याबाबत नागरिकांच्या वतीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे कमलाकर मोहिते यांनी निवेदनाद्वारे अर्ज देऊन तक्रार दाखल केली .या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, प्रभाग क्रमांक ४ मध्ये वॉल कंपाऊंड व इतर कामाची तांत्रिक तपासणी व चौकशी करण्यात यावी. तसेच मंजूर अंदाजपत्रकापेक्षा भिन्न किंवा निष्कृष्ट काम आढळल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. सदर कामाच्या गुणवत्तेबाबत, मोजमापाबाबत व तसेच कामाच्या दर्जेबाबत शंका निर्माण होत आहे काही ठिकाणी काम अपूर्ण असून ते मंजूर आराखडा व अंदाज पत्रकाप्रमाणे झालेले नसल्याचे दिसून येत आहे तरी जोपर्यंत सदर कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये वरील सर्व मुद्द्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून कारवाई करावी अन्यथा आर पी आय पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मधील रहिवाशांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा कमलाकर मोहिते, हेमंत वाघ यांनी आर पी आय पक्षाच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर करीत देण्यात आला आहे.
( प्रतिनिधी:- निलेश सावळे )

