साक्री शहरात पुरवठा विभागाची मोठी कारवाई

 घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक  कारवाई.  

जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर  सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांचे साक्रीत धाबे दणाणले आहे.  साक्री शहरात पुरवठा विभागाने अचानक  धाड टाकून गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली. त्यामुळे घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यवसायिकां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  सध्या देशात आणि राज्यात घरगुती गॅसचा मोठा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे घरगुती गॅस वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना एका सिलेंडर साठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे , तर दुसरीकडे साक्री शहरात काही व्यवसायिकांनी नियमांचे उल्लंघन करत घरगुती सिलेंडरचा वापर चक्क व्यवसायासाठी करत असल्याचे समोर आले, या प्रकरणाची दखल घेत साक्री तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने धडक कारवाई केली असून, जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, मंडळ अधिकारी हेमंत लोंढे, सुनील साळुंखे, पुरवठा लिपिक भूषण पाटील, तलाठी सुजित पाटील, कोतवाल कुंदन सैंदाणे, दीपक सोनवणे या पथकाने कारवाई केली, या धाडसी कारवाईत एकूण पाच गॅस सिलेंडर जप्त केले आहेत, पाच पैकी तीन गॅस सिलेंडर हे पूर्णपणे  भरलेले आढळून आले आहेत तर दोन गॅस सिलेंडर हे रिकामे आढळून आले आहेत, प्रशासनाने अचानक केलेल्या कारवाईमुळे हॉटेल व्यवसायिक आणि व्यवसायिक आणि इतर व्यवसायिक यांच्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे, घरगुती वापराचा गॅस व्यवसायिक कारणांसाठी वापरणे हा कायद्याने गुन्हा असून, व्यवसायिकांनी व नागरिकांनी गॅस चा काळा बाजार थांबवा अन्यथा कडक कारवाई केली जाईल कसा इशारा प्रशासनाने केला आहे.     

( प्रतिनिधी :-निलेश सावळे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top