साक्री तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

साक्री शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. काल 19 मार्च रोजी  साक्री तालुक्यातील अंबापुर,  पेरेजपुर, अष्टाने ,कावठे ,कासारे, बेहेड ,व परिसरातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने झोडपली आहे.  गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर ऐन पीक काढणीच्या वेळेस मोठे संकट आले असून गहू, कांदा हरभरा,  आंबा,  आदी फळबाग व पिका॓चे पूर्णपणे नुकसान झाले आहे . शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या पार्श्वभूमीवर साक्री तहसीलदारांना निवेदन देण्यात आले .

( प्रतिनिधी : निलेश सावळे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top