फक्त 200 रुपयांसाठी देशाशी गद्दारी करून पाकिस्तानला 210 सीक्रेट विकले ; आरोपी एटीएसच्या जाळ्यात
गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची गोपनीय माहिती पाठवणाऱ्या एका आरोपीला पकडले आहे. गुजरातच्या ओखा पोर्टचा कर्मचारी दीपेश गोहील हा भारतीय जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला देत होता. ह्या माहितीच्या मोबदल्यात त्याला रोज 200 रुपये मिळत होते. त्याने आतापर्यंत 210 सीक्रेट पाकिस्तानला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच आतापर्यंत त्याने पाकिस्तानकडून 42,000 रुपये…
