चाळीसगावमधील हवालदार जयेश पवार याना लाच घेताना रंगेहात पकडले
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमधील हवालदार जयेश पवार यांनी मौजे तरवाडे येथील रहिवासी असलेल्या एका तक्रारदाराकडून तडजोडीअंती ४,००० रुपयांची लाच मागितली होती. त्यात पहिल्या हप्त्याच्या २,००० रुपयांची रक्कम खाजगी इसम सुनिल श्रावण पवार यांच्या हस्ते स्वीकारताना त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आलें.तक्रारदाराचा गावातील एका व्यक्तीसोबत झालेल्या वादानंतर त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता….
