
महाराष्ट्र

सरकारी वकीलही आता भाजपचेच राहणार काय ? उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर नाना पटोलेंचा सवाल…
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ऍड. उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली. मात्र पराभूत झाल्यांनतर लगेचच भाजपने त्यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला असून ‘आता सरकारी वकील ही भाजपचेच राहणार’ हेच भाजपने सिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केलाय.. सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा ही…

सख्खा बाप निघाला पक्का वैरी,अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीला संपवून नाल्यात पुरले
दिवसेंदिवस माणूस हैवान होत चालल्याची रोज नवीन उदाहरणे समोर येत आहेत. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून एकमेकांना संपविण्याच्या घटना घडत आहेत. धुळे जिल्यातील शिरपूर तालुक्यात नांदर्डे येथे उघडकीस आलेली घटना तर मन हेलावून टाकणारी आहे. वन जमीन शिवारात राहणाऱ्या अनिल पावरा याने आपल्याच अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यात लाकडी दांडका मारून तिला ठार मारले. मुलगी रडत…

जम्बो कॅनॉलच्या स्वच्छतेबाबत दिरंगाई का?, शिवसेनेचा दणका…
धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलपाडा योजनेचे श्रेय लाटण्याकरता सत्ताधारी भाजपाने जाणून बुजून नकाणे तलाव भरण्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप करीत यासंदर्भातशिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक्सप्रेस व जम्बो कॅनॉल वर जाऊन या दोन्ही कॅनॉलच्या दुरावस्थेबाबत आंदोलन करून सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी केली होती, या कॅनॉलची जबाबदारी असणारे…

धुळ्यात कोण मारणार बाजीपहा अधिकृत अपडेट..
धुळ्यात कोण मारणार बाजीपहा अधिकृत अपडेट.. धुळे लोकसभा मतदार संघासाठी सकाळी ८:३० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. या मतदार संघात एकूण १८ उमेदवार रिंगणात असलेतरी खरी लढत महायुतीचे डॉ.सुभाष भामरे आणि महाविकास आघडीच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात आहे. शासकीय आकडेवारीनुसार फेरीनिहाय मिळालेली अधिकृत मते अशी – पहिली फेरी –डॉ.सुभाष भामरे (भाजप) – ३३८७५डॉ.शोभा बच्छाव (काँग्रेस) –…

आदिवासी दुर्गम भागात दिली आरोग्य सेवा, हॅप्पीनेस ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन फाऊंडेशन चा उपक्रम
धुळे- नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ठाणाविहीर गावात हॅप्पीनेस ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन फाऊंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबीर घेण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जावेद नसरोद्दीन मक्रानी यांनी त्यांच्या आईच्या नावाने हे शिबीर घेतले.ठाणाविहीर गावाचे सरपंच मानसिंग वळवी, उपसरपंच –सरवरवसिंग नाईक , पोलिस पाटील संदीप पाडवी, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक महेश कुवर, शंकर कोठारी…

शिक्षकांचा बळी घेणाऱ्या खोट्या केसेस रद्द करण्याची मागणी
सोनगीरच्या एन.जी. बागुल संस्थेतील वाद सोनगीर विद्याप्रसारक संस्थेच्या एन. जी. बागूल हायस्कूलमध्ये गेल्या 40 वर्षांपासून संस्थाचालकांमध्ये अध्यक्षपदासाठी दोन गटात वाद सुरू आहे. दोन्ही गट एकमेकांवर खोट्या केसेस दाखल करीत असतात. त्यामुळे त्यात निष्पाप शिक्षकांचा नाहक बळी जातो. सोनगीर पोलीस ठाण्यात खोटी कागदपत्रे दाखवून एक ते दीड कोटीची शासनाची फसवणूक अशी एफआयआर 12 एप्रिलला सोनगीर पोलिस…

शिवसेनेने दिली नाशिकच्या संदीप गुळवेंना उमेदवारी,शुभांगी पाटील करणार बंडखोरी
धुळे – शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आता वेगळे ट्विस्ट आले असून शिवसेनेच्या उपनेत्या तसेच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षा शुभांगी पाटील यांनी उमेदवारीची जोरदार तयारी केली असतानाच शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने त्यांचा पत्ता कट करून नाशिकच्या संदीप गोपाळराव गुळवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे संदीप गुळवे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आणि लागलीच त्यांना उमेदवारीची…

शिंदखेडा पोलीस ठाण्यावर दगडफेक,वाहनाच्या काचा ही फोडल्या
शिंदखेडा (प्रतिनिधी समाधान ठाकरे,दोंडाईचा) : शिंदखेडा पोलीस ठाण्यावर शुक्रवारी रात्री उशिरा जमावाने दगडफेक केली. तसेच आवारात उभ्या असलेल्या सरकारी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. एका संशयितांवर पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी ‘आमच्या ताब्यात द्या’ असे सांगत काही जणांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. जमावाला चिथवून पोलीस ठाण्यावरच दगड-विटांचा मारा केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलीस कॉन्स्टेबल…

धुळ्यातील निर्दयी डॉक्टरने केली भिकाऱ्यालाबेदम मारहाण
धुळ्यात फाशी पूल लगत असलेल्या एका हॉस्पिटल बाहेर खुद्द डॉक्टरनेच एका भिकाऱ्यास काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री समोर आला. परिसरातील रहिवाश्यांच्या मोठी गर्दी करून संबंधित डॉक्टरला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत शांतता प्रस्थापित केली. पायाला जबर जखम झालेल्या भिकाऱ्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.फाशी पूल नजीक डॉ. मुकर्रम…

कृषी निविष्ठांचे विक्री करताना कोणीही चढ्या दराने विक्री करू नये- अधिकाऱ्यांच्या सूचना
दोंडाईचा- काल दि. २९ रोजी शिंदखेडा पंचायत समिती सभागृहात शिंदखेडा तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.सदर प्रशिक्षण प्रदीप कुमार निकम मोहीम अधिकारी जिल्हा परिषद धुळे हे अध्यक्षस्थानी होते याप्रसंगी श्री अरुण तायडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, शितलकुमार तवर, तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा, अभय कोर, कृषी अधिकारी पंचायत समिती…