श्री शिविप्र संस्थेच्या नॉर्थ पॉईंट इंग्लिश मिडियम स्कूलचा आयसीएसई बोर्डाअंतर्गत इयत्ता दहावीचा निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर झाला असून, शाळेने १०० टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलं आहे.
शाळेतील शुभ मनिष उपाध्ये याने ९८ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला असून, संपूर्ण जिल्ह्यात गौरवाचे स्थान मिळवले आहे. शंतनु जयेश कलाल याने ९७.२ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक, तर देवेश मिलिंद भुतडा याने ९७ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला आहे.
तसेच श्रीनिवास विश्वास पाटील आणि सिद्धेश सचिन पाटील या दोघांनी ९६.२ टक्के गुण मिळवत संयुक्त चौथा क्रमांक पटकावला, तर श्लोक उदय बिरारीस याने ९५.४ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला आहे. सानिका अतुल महाजन हिने ९३.६ टक्के गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
२४ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा अधिक गुण
या निकालात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे २४ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक, तर ५८ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
शिवाय विषयांमध्येही काही विद्यार्थ्यांनी अपूर्व कामगिरी केली असून बॉयोलॉजीमध्ये ५, इतिहासात ५, कॉम्प्युटरमध्ये ४, आणि मराठीत २ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
या यशाबद्दल नॉर्थ पॉईंट स्कूलचे चेअरमन कुणाल बाबा पाटील, अश्विनीताई कुणाल पाटील, तसेच प्राचार्या ज्यूडिथ आर. नेल्सन यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.
नॉर्थ पॉईंट स्कूलने पुन्हा एकदा धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आपली गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा सिद्ध केला आहे.
