धुळे : विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने रविवार, 30 मार्च 2025 रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा ग्रामदैवत श्री एकविरा माता मंदिर येथून सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार आहे.
हिंदू नववर्ष स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील प्रभावशाली मठ, मंदिर आणि व्यायामशाळा यांना मान म्हणून पूजा संचांचे वाटप करण्यात येणार आहे. हिंदू नववर्षा निमित्त शहरातील प्रभावशाली मठ मंदिर व व्यायाम शाळा यांना मान म्हणून पूजा संचाचे वाटप करण्यात येणार आहे. पूजा संचाचे वाटप शुभारंभ पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रकाश पाठक, एड. यतीश गुजराती, एड. समीर पंडित, एड. महेंद्र जैन, निवृत्ती पवार, क्रीडाइ संघटनेचे शांताराम पाटील, सुमित बोरसे, यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी योगीराज मराठे, भरत देवळे, भाऊ महाराज रुद्र, विजय पाच्छापूरकर, महेंद्र विसपुते,उमेश चौधरी, दिलीप सूर्यवंशी, नाना महाराज हालोर, लोकेश चौधरी, निलेश गुरुजी, अमित खोपडे, विनायक बडगुजर, सचिन मराठे, अनिल ठाकूर, कृष्णा शिंदे, अनिल थोरात, जयेश चौधरी, राहुल चौधरी, मिलिंद चौधरी, रितेश चौधरी, आशिष शर्मा, वैभव रानमाळे, चेतन उपाध्याय व समितीचे सहकारी उपस्थित होते.