शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमठवणाऱ्या आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलाने यंदा बारावी परीक्षेच्या निकालात सर्व 18 शाखांचा 100% निकाल लागवून नवा शैक्षणिक आयाम गाठला आहे. एकूण 1856 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 1852 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संकुलाचा एकत्रित निकाल 99.78% इतका लागला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये 6 जणांनी 90% पेक्षा अधिक आणि 116 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
शिरपूर तालुक्यातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी चौधरी डिंपल दिनेश हिने 93.17% गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विज्ञान शाखेतील यशस्वी ठरणारे प्रमुख महाविद्यालय व विद्यार्थी:
- आर.सी. पटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर: 100% निकाल
- कुणाल पाटील – 91.67%, प्रध्दुम शर्मा – 90.67%, सार्थक जोशी – 88.33% इ.
- एच.आर. पटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय: 100% निकाल
- निकिता मोरे – 87.50%, अक्षरा चौधरी – 87%, दिव्या पवार – 86.67% इ.
- आर.सी. पटेल इंग्लिश मिडियम सायन्स ज्युनिअर कॉलेज:
- नंदिनी देवरे – 91%, नेहा पाटील – 90.83%, वर्षा चौधरी – 89.50% इ.
कला शाखा निकाल:
- आर.सी. पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर:
- दिव्या वाघ – 84.67%, पायल शिंपी – 84.67%, माही चावडा – 83.33% इ.
- वरुळ, खंबाळे, खर्दे बु., भोरखेडा, टेकवाडे येथील शाखांनाही 100% निकाल.
- आर.सी. पटेल कला आश्रम कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर व निमझरी: अनुक्रमे 97% व 92% निकाल.
वाणिज्य शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये:
- डिंपल चौधरी – 93.17%, रिया माळी – 93%, मयुर सोनवणे – 87.17%, देवयानी सोनवणे – 86% इ.
शैक्षणिक यशाबद्दल अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, सचिव रेशा पटेल, सर्व संचालक, सीईओ डॉ. उमेश शर्मा यांनी विद्यार्थ्यांचे, प्राचार्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे कौतुक केले आहे.