भाजपच्या जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालीये कालावधी संपलेल्या आणि त्यांचा कालावधी पूर्ण झालेल्या नव्हता अश्या सर्वच जागांवर नियुक्त्या करण्यात आल्या. यात धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा पुन्हा गजेंद्र अंपळकर यांच्याकडे सोपवण्यात आली असून धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रामकृष्ण उर्फ बापू खलाणे यांची वर्णी लागली आहे.
धुळे शहरात दीड वर्षांपूर्वी गजेंद्र अंपळकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी आपले संघटनकौशल्य दाखवीत अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश घडवून आणला.शिवाय लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी पूर्ण झोकून समर्पित भावनेने काम केले. वरिष्ठ नेत्यांशी तसेच शहराचे आ. अनुप अग्रवाल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांशी चांगले सम्बन्ध प्रस्थापित केले. शहरात पक्षाचे भव्य, सुसज्ज कार्यालय व्हावे यासाठी आपल्या मालकीची करोडो रुपयांची जागा उदार भावनेने पक्षाला समर्पित केली. त्यांच्या या साऱ्या कामांची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुहा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
रामकृष्ण उर्फ बापू खलाने हे पक्षात निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात त्यांनी चांगली पकड निर्माण केली. यापूर्वी जिल्हापरिषदेच्या एकापेक्षा जास्त वेळ निवडून येत सभापती पदाची धुरा ही सांभाळली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी धुळे तालुक्यासह मतदारसंघ पिंजून काढण्यात त्यांचेही मोठे योगदान राहिले. त्यांच्या माध्यमातून धुळे तालुक्याला पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी निलेश माली , जळगाव शहर दीपक सूर्यवंशी , जळगाव पूर्व चंद्रकांत बाविस्कर , जळगाव पश्चिम राधेश्याम चौधरी , मालेगाव निलेश कचवे , अहिल्यानगर उत्तर नितीन दिनकर आणि अहिल्यानगर दक्षिण दिलीप भालसिंग यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली ते. पक्षाचे प्रदेश निडवणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांच्या स्वाक्षरीने आज १३ मे रोजी प्रदेश कार्यालयातून संपूर्ण महाराष्ट्राची यादी जाहीर झाली.
