ट्रॅक्टर खाली दाबले गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू

जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एमआयडीसी खादगाव ते आंबीलहोळ रस्त्यावर आज २० मे रोजी दुपारी दुर्दैवी अपघात घडला. ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन खोल खड्यात कोसळले. या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालक गुलाब जमा चव्हाण (वय ३५) यांचा ट्रॅक्टरच्या खाली दबून जागीच मृत्यू झाला.
ट्रॅक्टर उलटल्यामुळे गुलाब चव्हाण हे वाहनाबरोबर खालच्या खड्यात पडले. ट्रॅक्टर पूर्णपणे त्यांच्या अंगावर गेल्याने या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आरोग्यदूत जालमसिंग राजपूत, कैलास पालवे, बाळू चव्हाण, नटवर चव्हाण आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. गंभीर अवस्थेत असलेल्या चालकाला उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top