लूटेरी दुल्हन” म्हणून ओळखली जाणारी अनुराधा पासवान हिला भोपाळ येथून राजस्थानच्या सवाई माधोपूर पोलिसांनी अटक केली आहे. केवळ सात महिन्यांच्या कालावधीत तिने २५ पुरुषांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली होती. प्रत्येक लग्नानंतर ती नवऱ्याच्या घरी काही दिवस राहून, मौल्यवान वस्तू आणि पैसे घेऊन पळ काढत होती.
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अनुराधाने मॅट्रीमोनी वेबसाईट्स आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून आपली शिकार निवडली. ती बहुधा विधुर, घटस्फोटीत किंवा आर्थिकदृष्ट्या सुसज्ज असलेल्या पुरुषांना लक्ष्य करत होती. ती स्वतःला आदर्श पत्नी म्हणून सादर ककरे, विश्वास संपादन करत नंतर विवाह करत असे. मात्र लग्नानंतर काहीच दिवसांत ती सर्व किमती वस्तू व पैसे घेऊन फरार होत असे.एका प्रकरणात, २० एप्रिल २०२५ रोजी तिने सवाई माधोपूरमधील विष्णू शर्मा या व्यक्तीशी विवाह केला. लग्नाच्या केवळ १४ दिवसांनी, तिने कुटुंबातील सदस्यांना अन्नामध्ये काहीतरी घालून बेहोश केले आणि मौल्यवान वस्तूंनी भरलेल्या बॅगा घेऊन फरार झाली. पोलिसांनी अनुराधाच्या गुन्हेगारी कारवायांचा तपास सुरू केला आहे आणि अन्य संभाव्य फसवणूक पीडितांचे तपशील शोधण्याचे काम सुरू आहे. या फसवणुकीत तिचे इतर काही साथीदारही सामील असावेत असा पोलिसांचा संशय आहे.
