धुळे – कृषी विभागाच्या वतीने आज पहाटे अनधिकृत बियाणेविक्री विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. वेशभूषा परिधान करून गुप्तपणे केलेल्या या छाप्यांत धुळे तालुका व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली.या कारवाईत ९ गोण्यांमध्ये भरलेली सुमारे ९०० बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून, त्याची एकूण किंमत अंदाजे १३ लाख ५० हजार रुपये इतकी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आणखीही अनधिकृत बियाण्यांचा साठा मिळण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे.या कारवाईनंतर जिल्ह्यातील बोगस बियाणेविक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.– समाधान ठाकरे, दोंडाईचा
