स्व. दाजीसाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त 115 आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

धुळे | प्रतिनिधी
रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट आणि गुरुकुल फाउंडेशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री स्व. दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार नगर, देवपूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे साहित्य आणि वाणिज्य महाविद्यालय, धुळे येथील प्राचार्य डॉ. रवींद्र वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास रिअल इंडो ग्लोबलचे अध्यक्ष डॉ. संभाजी पाटील, उपाध्यक्ष डॉ. मोहन पावरा, डॉ. प्रवीण मोरे, समन्वयक डॉ. दीपक पाटील, शिवानंद भजनी मंडळाचे संचालक उखडू बाबा, नीलवर्ण पाटील, किसन कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाबाबत माहिती देताना आयोजक डॉ. संभाजी पाटील यांनी सांगितले की, “स्व. दाजीसाहेब पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि सन्मान म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.”

या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. एस. टी. पाटील, राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल गोपाळ, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी विशेष मेहनत घेतली.
या प्रसंगी एकूण 115 आदिवासी मुला-मुलींना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद झळकत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top