शेतीच्या मशागती वेळी विज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; शिरपूर तालुक्यातील घटना…

शिरपूर तालुक्यातील ताजपूरी येथील शेतात मशागतीचे काम करत असलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत नथ्थू हारचंद्र सनेर (रा. ताजपूरी) यांचा जागीच मृत्यू झाला.

नथ्थू सनेर हे आपल्या आढे शिवारातील शेतात मशागतीचे काम करीत होते. दुपारच्या सुमारास ते पाणी पिण्यासाठी थोडा वेळ बसले असता अचानक त्यांच्यावर आकाशातून वीज कोसळली. वीजेचा जबरदस्त फटका बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत नथ्थू सनेर यांना तातडीने थाळनेर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नथ्थू सनेर यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top