पनवेलचे सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले पाटील यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

पनवेलचे सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले पाटील यांना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.मुंबई येथील राजभवनात आज सकाळी झालेल्या शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.इन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून भाऊसाहेब ढोले हे ओळखले जातात. त्यांच्या नावावर पाच इन्काऊंटर आहेत. गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच जणांना त्यांनी जागीच कंठस्नान घातले.
त्यांनी यापूर्वी गडचिरोली,पुणे, नवी मुंबई येथे उत्कृष्ट सेवा बजावली आहे. नवी मुंबईत त्यांनी मोठे आर्थिक गुन्हे उघडकीस आणले आहेत.त्यानंतर ते नुकतेच पनवेल येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत.अहिल्यानगरचे जेष्ठ पत्रकार कैलास ढोले यांचे ते चिरंजीव आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top