शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू कारखान्यावर छापा; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी कुसटया पाडा, जामणपाणी, न्यू बोराडी येथे छापा टाकत एक बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त केला आहे. या कारवाईदरम्यान तब्बल २ लाख २७ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे प्रकरण उघडकीस आले. मच्छिद्र ऊर्फ सेहवाग ताराचंद पावरा नावाचा व्यक्ती आपल्या गावाजवळील झोपडीत बनावट दारू तयार करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. या माहितीनंतर, पोलिसांनी त्वरित पथक तयार करून छापामारी केली. या छाप्यात ५८ बॉक्स देशी दारू (टैंगो पंच) ,२०० लिटर स्पिरिट ,साधे पाणी भरलेला २०० लिटर ड्रम, ३ प्लास्टिक ट्रे ,५० खोके, ५८ काचांच्या रिकाम्या बाटल्या , २० लिटरची हिरवी बादली, १८० रिकाम्या बाटल्या असा एकूण २ लाख २७ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या घटनेबाबत पोलिस नाईक विजय धनमुखलाल डिवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास पोसई मिलिंद पवार करीत आहेत.
हि कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सई मिलींद पवार, हेकॉ संतोष पाटील, कॉ स्वनिल बांगर, योगेश मोरे, संजय भोई, विजय डिवरे, दिनकर पवार, धनराज गोपाळ, सुनिल पवार यांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top