बंदुकीच्या जोरावर दोघांना ४ कोटींची रोकड लुटली

धुळे तालुक्यात परमेपाडा शिवारातील घटना

उत्तरप्रदेशातून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या दोघांना मुंबई-आग्रा महामार्गावर सिनेस्टाईल लुटण्यात आले आहे. लुटारूंनी बंदुकीच्या जोरावर दोघांना धमकावत त्यांच्याकडे असलेली ४ कोटींची रोकड पळवून नेली. या घटनेने मोठी खळबळ माजली आहे. घटनेचे वृत्त कळताच एलसीबीसह तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. तसेच युद्ध पातळीवर लुटारूंचा शोध जारी झाला असून पोलिसांचे पथक लुटारूंच्या मागावर आहेत.

पहाटेला घडला थरार!

गुजरातचे दोघेजण स्कार्पिओ (एमएच ४३/सीसी ०२६४) वाहनाने लखनऊहन नाशिकच्या दिशेने जात होते. हे दोघेजण आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास पुरमेपाडा शिवारात आले असता त्यांना रस्त्यात अडविण्यात आले. चार चाकी वाहनातून आलेले पाच ते सहा लुटारु हे थेट स्कार्पिओसमोर उभे ठाकले होते. त्यांनी
दोघांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून धमकावले. तसेच एकाला बेदम मारहाणही करण्यात आली. संख्येने जास्त असलेल्या लुटारूंच्या दांडगाईपुढे दोघांचा निभाव लागला नाही.

वाहन नेले लळींगच्या दिशेने

लुटारूंनी गुजरातच्या त्या दोघांना स्कॉर्पिओतून उतरवून आपल्या वाहनात डांबले. तसेच स्कॉर्पिओचा ताबा त्यांच्याकडे घेवून दोन्ही वाहन लळींग घाटाच्या दिशेने वळते केले. थोड्याच वेळात लळींग घाटात सदर वाहनं थांबवून लुटारूंनी स्कार्पिओत ठेवलेली रोकड लुटून पोबारा केला. तसेच स्कॉर्पिओ तशीच सोडून दिली.

लुटारूंच्या हाती लागले घबाड

या लुटीत जवळपास ४ कोटी ५ लाखांचे घबाड लुटारूंच्या हाती लागले. पैसा हाती पडताच वायूच्या वेगाने लुटारू पसार झाले. लुटीचे शिकार झालेल्या त्या दोघांनी भेदरलेल्या अवस्थेतच मालेगाव पोलीस ठाणे गाठले. मात्र, ही घटना धुळे तालुका पोलिसांच्या हद्दीत घडल्याने ते दोघे पुन्हा धुळे तालुका पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना गुदरलेली हकीकत

लुटारूंना मिळाली पक्की टीप ?

महामार्गावरून स्कॉर्पिओ मोठी रक्कम घेवून जात असल्याची टीप लुटारूंना मिळाल्याचा संशय आहे. महामार्गावरून बऱ्याच गाड्या येत-जात असतानाही लुटारूंनी नेमकी स्कॉर्पिओच थांबवली. याचा अर्थ लुटारूंना रक्कमेबाबत पक्की बातमी मिळालेली होती. सदर लुटीचा पैसा हा एका खाजगी कंपनीचा असल्याचे समजते. त्यामुळे पोलीस युपी आणि नाशिक कनेक्शन देखील धुंडाळत आहे. सांगितल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले.

पोलीस घटनास्थळी

लुटीची माहिती मिळताच एलसीबी पीआय श्रीराम पवार, तालुका पीआय धनंजय पाटील, पीएसआय छाया पाटील, कर्मचारी उमेश पवार, कुणाल शिंगाणे, छोटू खांडेकर, महेंद्र गिरासे, रविंद्र सोनवणे, कुणाल पानपाटील, विशाल पाटील, सुमित ठाकूर, चेतन कंखरे यांच्यासह एलसीबीचे मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, योगेश जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top