धुळ्यानजीक एका कारमधून जाणाऱ्या दोघांना पिस्टलाचा धाक दाखवत आठ दरोडेखोरांनी तब्बल दिड कोटींची रक्कम लुटल्याचा प्रकार नुकताच घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धुळे तालुका पोलिसात आठ दरोडेखोरांविरेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुरूवातीला तक्रारदारांनी लुटीची रक्कम चार कोटी असल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात तक्रारीत ही रक्कम दिड कोटी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.मात्र दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारांची हिम्मत कोणाच्या बळावर? असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय.
सुरत येथील कल्पेश रमणभाई पटेल व भरत जीवनभाई भालीया हे स्कॉर्पिओ द्वारे दिड कोटींची रक्कम घेवून धुळेमार्गे नाशिककडे जात असताना धुळे तालुक्यातील पूरमेपाडा उड्डाणपुलाजवळ पहाटेच्या सुमारास एक कार आडवी आली व नंतर आणखी एक दुसरी कार आली. यावेळी दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून वाहनातील रोकड लूटली. सुरूवातीला ही रक्कम चार कोटींची असल्याचा दावा संबंधितानी केला मात्र तक्रार देताना ही रक्कम दिड कोटी असल्याचे नमूद करण्यात आले…. या घटनेने धुळे तालुक्यात एकच खबर माजली आहे मात्र इतकी मोठी रक्कम ही हवाल्याची असल्याचे बोलले जात आहे.
