शिरपूर तालुक्यात दगड मारून युवकाचा खून; आरोपीला अटक

शिरपूर │ शिरपूर तालुक्यातील झेंडे अंजन गावात किरकोळ वादातून एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातीलच विकास विजय महाले याने 7 जुलै रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास भांडणाच्या दरम्यान देविदास उर्फ देवा गुलाब बहिरम यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर दुखापत केली होती.

जखमी अवस्थेत देविदास बहिरम यांना तातडीने धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर आरोपी विकास विजय महाले यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास शिरपूर तालुका पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top