15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना घेरावाचा इशारा
धुळे तालुक्यातील मोरदड गावातील जगदीश ठाकरे यांच्या हत्येचा निषेधार्थ आज धुळ्यातील आदिवासी बांधवांनी आणि इतर सामाजिक संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जगदीश ठाकरे यांच्या खून प्रकरणी मुख्य सुत्रधार गोविंद शिवाजी पाटील याला अटक करा, सर्व आरोपींना फाशी द्या तसेच पिडीत ठाकरे परिवाराला तत्काळ 50 लाखांची आर्थिक मदत द्या, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात मयत जगदीश ठाकरे यांच्या पत्नी अरुणा ठाकरे यांना यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंखर आण्णा खरात यांनी 11 हजार रुपयांची मदत देखील यावेळी करण्यात आली….
तसेच जगदीश ठाकरे यांची हत्या राजकीय वादातून झाली असून याप्रकरणी मुख्य आरोपी असलेला गोविंद शिवाजी पाटील याला अटक करा अशी मागणी आम्ही करीत आहोत मात्र पोलीस प्रशासन आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही पालकमंत्री जयकुमार रावल यांना घेराव घालणार असून जगदीश ठाकरे याला न्याय द्यावा अशी मागणी करणार आहोत अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली..

