धुळे जिल्ह्यातील दभाषी गावाजवळ आज २९ जुलै रोजी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. दोन व्यक्तींनी तापी नदीत अचानक उडी घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या दोघांचे नाते नेमके काय आहे ? ते पती-पत्नी आहेत की प्रेमसंबंधित युगुल ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघंही शिरपूर तालुक्यातील असल्याची माहिती पुढे येत आहे.
माहिती मिळताच नरडाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, नदीत शोधमोहीम सुरु आहे. मात्र सध्या तापी नदीला पाण्याचा ओघ जास्त असल्याने शोधण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन दलही त्यांना शोधण्यात प्रयत्नशील आहे. तापीच्या उडी मारून आत्महत्या करणारे हे नेमके कोण ? घटनेमागचं नेमकं कारण काय? प्रेम प्रकरण, कौटुंबिक वाद की इतर कुठलं दडपण? याविषयी अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
प्रतिनिधी – समाधान ठाकरे, दोंडाईचा
